Andaman Tour | Birthday spcial | Heaven on earth | havelock island | neil island | trip 2018

Tripoto
29th Nov 2018
Photo of Andaman Tour | Birthday spcial | Heaven on earth | havelock island | neil island | trip 2018 by Trupti Hemant Meher

&t=8s

अंदमान ..माझी सफर तस हे सर्व जग माझ्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये आहे. पण एवढ्या लवकर मी अंदमान ची झेप मारिन असे काही वाटले नव्हते पण देवाच्या सोबत काही जिवाभावाच्या मैत्रिणी ची कृपा झाली आणि आम्ही पोहोचलो अंदमान मध्ये. आणि ते ही माझा वाढदिवसाला. म्हणजे आता अजून काय बोलणार.. फक्त नेहमी 3 जनीं असणाऱ्या आम्ही या वेळी 6 झालो. 6 दिवस आणि 6 जनीं ..अंदमान च्या भूमी. सकाळच्या 7 च्या प्रहरील port blear ला उतरलो. विमानातून दिसणार ते अंदमान च्या airport चे वीर सावरकर विमानतळ हेय नाव बघूनच मन भरून पावले. त्या नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. बिर्थडे जरी माझा असला तरी यावेळी मी कोणतीही plNning केली नव्हती. यावेळी स्वयंभू होती वैश्यू... त्यामुळे मी पूर्णतः tourist होती. पहिल्या हॉटेल वर पोचलो बीच side सुपर होम स्टे होता. अंदमान कॅस्टेल नावाप्रमाणेच. थोडा वेळ आराम करून आम्ही आमच्या पहिल्या आणि महत्वाच्या spot कडे निघलो. Celuer jail आणि अंदमान चे नाते हे मी सांगायला नको. Season असल्यानी प्रचंड गर्दी होती. पण मी धाव घेतली सावरकर कोठडी कडे. गेल्या काही वर्षात जे काही सावरकरन विषयी वाचले होते. त्याचीच ती ओढ होती. ती 10/5 ची कोठडीक खूप काही सांगत होती. 5 min मी शांत बसून सावरकरांचा फोटो पहात होती. खूप सारे विचार येत होते. आपल्या स्वतंत्र भारताची कहाणी ती खोली सांगत होती. खूप जण त्या जेल मध्ये आत जाऊन फोटो काढत होते .. नको रे नको. त्यानी आपल्या साठी जो त्याग केला त्याचे हेय विद्रुप गोष्टी करून मातीमोल करू नका. त्या नंतर चा light music show म्हणजे एक विचार करायला लावणारी अनुभूती होती. काय बोलणार .. साष्टांग दंडवत या भारत मातृभूमीच्या सुपुत्राला ???? दुसऱ्या दिवशी लवकरच उठलो असे ही इथे 5 ला सूर्य उगवतो .. सुंदर पहाट .. आणि तो निळाशार समुद्र पाहत havelock island ला पोहचलो. अजून एक भन्नाट जग .. port blair city तुन अचानक island ला आली होतो. एकच होते तुम्ही कुठेही फिरा तो निळाशार समुद्र तुमची साथ सोडत नव्हता. आजचा दिवस राधा नगर किनारा वरचा होता. पण अचानक december महिन्यात पाऊस आणि तो ही वीज गडगडाट. आणि मी तर हवेतच .. पाऊस हा प्रकार मला खूप आवडतो आणि तोही असा अचानक. मला वाटले मी आली म्हणून .. ???? .. पण थोडावेळातच केलेले इथे कधी ही पाऊस कोसळतो. हे एकूण मी तर प्रेमातच अंदमानच्या. यावेळी मी planning केले नसल्या मूळे सर्वच गोष्टी आ करणाऱ्या होत्या मला .. त्या पावसातच आम्ही राधानगरी बीच वर खूप मज्जा केली. मज्जा एवढी होती की माझा फोन पाण्यात. आता काय नो फोन.. फोन ठेवला आणि परत समुद्र वर आली आणि मज्जा चालू ठेवली.. रात्री म्हणजे संध्याकाळ चें 6 वाजता हॉटेल वर आलो. दुसऱ्या दिवशी birthday होता. इथे आल्यापासून नेटवर्क तर नव्हतेच पण आता फोन ही नव्हता. मी आणि तेही नो फोन झोन मध्ये मला ही विश्वास बसत नव्हता. असो जीवन चालतच राहते???? खूप काही मेहनतीने cake मिळाला. रात्री 12 वाजता वैशु फुगे घेऊन आत आली. 3 ही झोपेत होतो. खूप वर्षांनी पेटी cake खाल्ला होता. 5 min बिर्थडे उरकून आम्ही झोपी गेलो. कारण उद्याचा दिवस माझा काय सर्वां साठी खास होता. 1 डिसेंबर जन्मदिवस .. भन्नाट तर करायचाच होता .. plan होता scuba diving चा तस गेल्यावर्षी तारकली ला ट्रायल झाली होती पण यंदा अंदमान होते. सकाळी havelock island ल पोचलो. आता वेध होते ते NEMO ला भेटायचे. वातावरण तस ढगाळ च होते. ट्रेंनिग सुरू असतानाच पाऊस सुरू झाला. थोडीशी भीती होती. पण निमो ला बगण्यासाठी मी काहीही करायला तयार होती. तस मी माझा ट्रेनर ला पण सांगितलं. काही वेळातच मी 30 फूट आत समुद्रात होती. निमो काय निमो चे पूर्ण कुटुंब माझी वाट बघत होते. निमो बरोबर खूप साऱ्या माशाचे दर्शन झाले. ती 25 min जणू काही मी disney chya movie मधली ariel च आहे असे वाटत होते. बाहेर यावेसे वाटत नव्हते पण time up. वर आल्यावर जोराचा पाऊस सुरू होता गरम गरम पाण्यात थंड थंड पावसाच्या सरी. खूप वेळ मी किनाऱ्यावर पाण्यात बसली होती. किनाऱ्यावर निघून आम्ही एक रेस्टरांत मध्ये मस्त कोकरी नावाच्या फिश वर ताव मारला.हॉटेलवर परत आली होती पण मन त्या निमो जवळ च अडकले होते. आज अजून एक adventure dream पूर्ण केले होते. फोन नसून 24 तास झाले होते. पण काही फरकच नव्हता. या अंदमान मध्ये मी गुंगून गेली होती. चौथ्या दिवशी neil island ला निघालो. दुपारी जेवायला तिथेच पोचलो. लक्ष्मण नगर beach ची सफर करायची होती. तिथे आम्हाला एक चांगले guid मिळाले. खूप मस्त सफर झाली. त्या नंतर अचानक एक नवीन मित्रा मूळे आम्ही सितांपुर beach ला गेलो. तिकडे ग्लास बोट मधली सैर केली. खूप सुंदर अनुभव होता. खूप सारे कासव बघायला मिळाले. बाहेर येऊन मी जेट स्की पण अनुभवली . अशी आधी ही खूप वेळा केली होती पण या निळ्याशार पाण्यातला अनुभव खूप सुंदर होता. असे सुंदर नील island चा अनुभव घेऊन आम्ही पोर्ट ब्लेर ला आलो. आता काय फक्त खरेदी बाकी होती. पप्पा नि सांगितले म्हणू एक मस्त शंख आणि आठवण म्हणू एक सुंदर ear रिंग घेतले. आणि एक मस्त पोर्ट ब्लेर ची night ride केली . रात्री मस्त जेवण झाले. काही नवीन बंगाली पदार्थ खायला मिळाले. रात्री मस्त झोपी गेलो . सकाळी अंदमान 7 वाजता सोडले. पुन्हा येणाच्या आशेवर.. आणि परत आपल्या मुंबईत आगमन झाले. घरी येऊन आज महिना झाला... पण तो निळाशार समुद्र .. तो निमो .. अजून ही डोळ्यासमरून जात नाही.. असा हा माझा अंदमान अनुभव..