यक पिलेट लाव ..शेवची ! मी भाकरी टाकत्येत यांच्यासनी. त्या मागल्या टीबलावरची आरडर घेतली का तू ? बाजरीच्या पीठाने माखलेले हात आणि सगळीकडे नजर न टाकताही बारकाईने लक्ष असलेल्या या रुपाली हॉटेल च्या मावशी आज मनाला खूप भावल्या. Womes are really allrounders. त्यांचं work dedication त्यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत आणि त्यांचं कामावर असलेला प्रेम एक perfect package असत आणि ते मला या मावशीमध्ये दिसला. Women त्या कुठल्या पण गोष्टीत हात घालतात तर त्याच सोनंच करून सोडतात. निम्मित वणी च म्हणून आम्ही आज रुपाली हॉटेल ला भेट दिली. दुपारचे सुमारे 1.30 वाजले असतील, पोटात कडकडून भूक लागलीच होती. मला भाकरीच खायची होती म्हणून आम्ही तसं हॉटेल शोधत होतो आणि रुपाली हॉटेल ला येऊन पोचलो. ताजे ताजे शेतातून काढून आणलेलं वांगे, कोथिंबिर च्या जुड्या,टोमॅटो आणि भाजीपाला, शेव, मुरमुरे, फरसाण ची एक सरळ रांग अन अल्याड एक मावशी स्टो वरती लोखंडी कढई मध्ये भाजी टाकतायेत आणि पल्याड दुसऱ्या मावशी खाली बसून चुलीवर भाकरी भाजतायेत, अस perfect combination असलेल्या हॉटेल मध्ये आम्ही घुसलो, आजू बाजू ला अधून मधून एक काका मिरवत होते. शांत म्हणजे फारच शांत इतके शांत की order काय हे विचारायला पण त्यांना त्यांची शांतता permission देत नव्हती. मूठभर चिरलेला टोमॅटो आणि कांदा घेऊन मावशी एक पाठोपाठ त्या लोखंडाच्या तापलेल्या कढई मध्ये टाकत होत्या आणि तसं तसं ठसका छपरावर जाऊन पूर्ण वणी च्या कोपऱ्यात सुगंध दरवळत होता. आमची ऑर्डर घेण्यासाठी काका fail झालेले पाहून मावशींनी अगदी त्यांच्या छोट्याश्या kitchen मधूनच आम्हाला विचारलं ताई काय दिवू तुला ? मी विचारले काय काय आहे सांगा मावशी ! अगदी मावशींनी नॉन-स्टॉप सूर लावत सांगितलं पिठलं भाकरी, ठेचा भाकरी, बैंगन भरता, बैंगन मसाला, शेव टमाटर, पनीर टिक्का, ठेचा, मटकी, चवळी सांग काय काय दिवू तुम्हाला ?? थोडंसं formality discussion करून आम्ही शेवभाजी आणि बैंगंन मसाला ची ऑर्डर दिली. अन जे मावशी झुंपल्या पदरखोचून 5 व्या मिनिटाला आमच्या टेबलावर मागावलेल्या 2 भाज्या होत्या आणि त्याच मावशी लगेच भाकरी टाकायला बसल्या.140 चा स्पीड लावून त्यांनी त्या भाकरी पण 5 मिनिट मध्ये गरमागरम ताटात वाढल्या. बरं हे करताना मावशी प्रत्येक टेबल वरची ऑर्डर, त्याचा हिशोब आणि त्यांची special डिमांड सगळं लक्षात ठेवून स्वतःच काम तितक्याच fast मध्ये करत होत्या. काका मावशीचे Mr. मावशी त्यांना reminder टाकायची frequntly orders बद्दल. पण काकांच सगळं शांततेत चालू होतं एका हातात फडकं घेऊन हॉटेल चे चारही कोपरे ते हिंडत होते आणि इकडे मावशी order घेतल्यापासून हिशेबापर्यंत सगळंच चोख बघत होत्या. आहे की nahi all rounder. वांग्याचं भरीत आणि शेवभाजीची चव ही शब्दांत मंडण्यासारखी नाही. कमाल, super, अप्रतिम, मस्त किती पण शब्द मांडा ते थोडेच असतील. मला राहवलं नाही म्हणून मी मावशींना शेवभाजी ची receipe विचारली, त्या म्हणे काही नाही ग ताई ! अद्रक लसणाची पियस्ट टाकली आणि आपल लाल तिखट मसाला...मला हे curosity आहे म्हणून मी तेवढं उगाचच विचारलं खरं सांगायचं तर ती चव ही मला कुठेच जगाच्या पाठीवर मिळणार नाही कारण, त्या भाजीला लागलेलं त्या गाव च पाणी, मावशींच्या हाताची चव आणि माया आणि करण्याची एकूण एक ती unique त्यांची पद्धत..ते सगळं फक्त तिथेच मिळणार. मावशींना जेव्हा मी सांगितलं मी लिहीत असते आणि मी तुमचा फोटो काढणार आणि तो सगळ्यांना दिसणार तेव्हा मावशी थाडकंन अश्या उभ्या राहिल्या, कंबरेवरचा खोचलेला पदर काढला आणि बाजरीच्या पीठाने माखलेल्या हाताने चेहऱ्याला जशी ponds ची पावडर चोळावी असं साधेपणाचा makeup करून मावशी तयार झाल्या. आता काढ फोटू माझा अशी मावशींनी मला demand टाकली. किती साधी आणि भोळी असतात ना ही माणसं ..मी काही फार मोठी लेखिका नाही तरी त्यांना माझं जगवेगळच कौतुक की त्या साठी त्यांनी भाकरीची उलातानी पण फटकन खाली टाकली. अगदी निरोप घेताना त्यांनी मला आवर्जून सांगितले, आग ताई तू माझा फोटू टाकाशील ना लोकांनकडे मग त्यांना सांग पोटभरून जेवण मिळत, रुपाली हॉटेल रस्त्याच्या कढ्यालाच आहे, कुणलाबी इच्चारा पार हाटल जवळ येऊन सोडतील अस सांग सगळ्यांना, अन तू पण ये परत ग ताई अस म्हणून आमचा निरोप speech झाला.
तुमच्या पैकी कोणी कधी सप्तशृंगी गड, वणी ला भेट दिली तर नक्की रुपाली हॉटेल ला जा असं मी आवर्जून सांगेल...मावशीने सांगितले म्हणून नाही तर त्यांच्या हातचे चविष्ठ वांगे खाल्ले म्हणून अगदी मनापासून मला वाटत एकदा तरी हा बेत करून याचं...
#मलाभावलेलीमाणसं
#localpeople
#localdiaries
#explorepeople
#workdedication
#businesswomensofindia