इरशाळगड

Tripoto
7th Sep 2020
Photo of इरशाळगड by Akshay Sail
Day 1

इरशाळ गड

संपूर्ण जग  कोरोना च्या  विळख्यात अडकल होत.आम्ही भटके घरात  तुरुंगात डांबून  ठेवल्या  प्रमाणे  बंदिस्त झालो  होतो, एकदा त्या  सह्याद्री च्या  कुशीत  जाऊदे, त्याच्या  अंगावर  खेळूदे  हीच भावना  मनातं  तरंगत  होती.
4 सप्टेंबर 2020, उद्या  शनिवार आहे  जाऊया  का  बाहेर? असा तिचा  मेसेज आला, ती  म्हणजे  दिपाली (एक निसर्गप्रेमी, फोटोग्राफर  )कुठे  जावं?  काय  चालू  असेल  हेच कळत  नव्हतं, काय  होईल  ते  होईल आता  बाहेर पडू, बघू  काय  होतय म्हणून  जायचं  निश्चित  केल. खूप  फोन  ह्याला  त्याला  केल्यानंतर इरशालगड चालू  असल्याची चाहूल  लागली. इरशालगडला  जायचं पक्क झालं. तिने सकाळचा  नाश्ता  घरूनच आणला  होता.चढाईला जायचं  ऐकून  माझी  रात्रीची  झोप  हरवली  होती, पुन्हा  एकदा 2019 मधल्या  भटकंतीच्या  प्रवासात  मी पोचलो  होतो

रात्रभर  इरशालगडाची  माहिती  जमा  करताना  काही  माहिती  कळून आली ती म्हणजे गड मुंबईपासून  अत्यंत  जवळ म्हणजेच  मुंबई पुणे  जुन्या  रोड जवळ  आहे. इरशाळ गडाचा तसा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला तेंव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक ह्या गावी झाला
नेताजी पालकर यांचं नाव  ऐकून माझा  माझा  चेहरा  खुलून  आला.
गडाची उंची 3700फिट  असून, अत्यंत  कठीण  चढाई क्षेत्र  असल्याचे  कळून  आले  पण  जायचंच  असा  निर्धार झाला.
गेल्या वर्षीचं सगळं सामान  जमा  करायला  लागलो, खूप  दिवसांनी जायचं म्हणून  स्वतःकडे आरश्यात  पहात होतो, स्वतः कडे  पाहून  असंच  वाटत होत मी चढू  शकेन  कि नाही.
ठरल्या प्रमाणे आम्ही सकाळी  भेटलो, आणि  आमची गाडी इरशालगडाच्या ठिकाणी  जाऊ लागली,मुंबई सोडल्या  सोडल्या  दिपालीच्या  चेहरा एकदम खुलून आला. खूप कडाक्याच ऊन  पडल होत. त्यात  दीपालीने सकाळी  उठून  बनवलेल्या नाष्टावर मी  ताव  मारली. काही गाड्या पार्किंग  केलेल्या  पाहून  आम्ही  सुखावलो, त्या ऊनापेक्षा आम्हाला  वरती  जायला  मिळणार  म्हणून  जास्त खुश  होतो.
सोबत अजून काही लोकांनी  चढाईला  सुरवात केली , सोबत कोणी  आहे हे  बघून  बर्रर्रर्र  वाटल. पहिल्या  टप्प्यातच मला त्रास जाणवू  लागला, दिपाली ने ते ओळखलं आणि  मला  मास्क  काढायला सांगितलं, मी सुद्धा  विसरून गेलो  होतो  आपण  कोरोनाच्या दुनियेतून  बाहेर  आलोय, वरती इरशाळवाडी पर्यंत पोचायचं  होत, मी खूप  वेळा  थांबत  होतो. पण बाजूच  मोर्बे धरण  बघून स्वर्ग म्हणजे हेच  अस वाटत होत.

इरशाळवाडीत  पोचल्यावर  हि  लोक  कस राहतात  एकच  प्रश्न  सतवत होता. तिकडची घर  बघत रहावस  वाटत होत.
अशी घर काही  काळाने आपल्याला बघायला  मिळनार  नाही  अस दिपाली  म्हणत  आम्ही  पुढे गेलो, तिकडच्या माणसाचा पेहराव पाहून  मला  पुन्हा  एकदा जैत रे  जैता चित्रपटाची आठवण  आली
. तिकडे पोचल्यावर अर्धा रस्ता  पूर्ण  केल्याचं एक समाधान  होत, खूप दिवसांनी वाहत पाणी,गायी, खूप  सारी  फुलपाखरं बघून मन  हरवून  गेलं  होत, आणि  हे  सगळं  बघून  मला एक  शक्ती  येत  होती  पुढे  जाण्याची. त्यात  आमची  पायवाट चुकली, राखणीला बसलेल्या  काकीने पुन्हा माघारी  पाठवलं आणि  रस्ता  मिळाला, मी खूप  थांबत  होतो. आणि  त्यातच गड दिसू  लागला, आम्ही  सुखावलो, उन्हाचे  चटके  खात  दुपारच्या वेळी गडावर पोचलो
पण  मागून फिरून नाळीमध्ये जाता  येईल  अशी  माहिती  तिकडे  चढाई  करणाऱ्यांनी  दिली, आम्ही मार्ग  शोधू  लागलो, दिपाली  नाळी साठी  खूप  आतुर  होती. पण  एका ठिकाणी  परत परतावे  लागले चढाई करण्यासाठी  दोरी  नसल्याने  दुसरा  मार्ग निवडला, मी गडावर  पोचलो  हीच गोष्ट  माझ्यासाठी  समाधानाची  होती. दिपाली अगदी  दहीहंडीला  चढाव  तशी  लगेच  वर  गेली  आणि पाणीच्या टाकीची पाहणी  केली
पाणी बरोबर  नाही  असा  आवाज  दिला  आणि  वरती  चढण जमत  नाही  असे ती ओरडली, कंठ  दाटून मोठ्या मनाने  ती  मागे  फिरली, आणि  आम्ही परत  गडाच्या  वाटेजवळ जायचं ठरवलं, मी डोळ्यावर कपडा घेऊन मातीमध्ये गुंतून  गेलो त्यात  बाजूने  सरसर  आवाज आला, आणि खूप सुंदर असा साप नजरेत आला  मी बघतच राहिलो, कडाक्याच ऊन  असल्यामुळे  आम्ही दोघे  एका दगडाखाली  गोष्टी करत थांबलो, अजून 2 सवंगडी तिकडे मिळाले, आम्ही गोष्टी  मध्ये  हरवून गेलो, खूप  बर्रर्रर्र  वाटल होत. खूप  दिवसांनी  चढाई मुळे   दमले  होते.
नंतर परत  एकदा शेवटचा एकदा  राम  राम  करत  आम्ही  उतरणीला  निघालो. उतरताना महाराजांच्या  पदस्पर्शाने पावन  झालेल्या  गडावरून सूर्याच्या  साक्षीने  एकदम  हळुवार  उतरलो, ऊन  गेल्यावर  सूर्यास्ताला माझी ताकद  सुद्धा वाढली. खाली  उतरताच ढगांना पण  रडू  आले, आणि  पुन्हा  भटकू असंच  कुठेतरी म्हणून  निघालो, एक थरारक  चढाई  आमच्यासाठी एक अविस्मरणीय चढाई  झाली.