लहानपणी ज्यांनी हाताच्या बोटाला धरून चालायला शिकवलं आई वडिलांसाठी आणि ज्यांनी आयुष्यात धावायला शिकवलं त्या " मुंबईकरांसाठी "…. !!!!
बॉम्बे म्हणा नाहीतर मुंबई …काहीना बॉम्बे खूप जवळच वाटतात आणि काहीना मुंबई खूप जवळच वाटत.
घडाळ्याच्या काट्यावर आणि टक्सी च्या मिटर वर रक्तच पाणी करायला जिने शिकवलं ती मुंबई …
भूकेलाल पोट हातावर वागवून भिक मागणाऱ्या भिकाऱ्यांची मुंबई …
लोकलच्या गर्दीत शेजार्यांच्या पायावर पाय देऊन तरी हे वेळो वेळी एकमेकांसाठी मदतीचा हाथ देणारी मुंबई ….
कधी भर रस्त्यात कधी कुणा कोपऱ्यात व्यक्त करणाऱ्या फडफडणाऱ्या कबुतरांची मुंबई …
एवढ जरी असाल तरी माणसाला परिस्थिती नुसार बदलायला आणि खांद्याला खांदा लाऊन ताठ मानेने जगायला शिकवणारी मुंबई ….
रस्त्या रस्त्यावर चौका चोकात ठाण मांडून बसलेला स्वस्त आणि मस्त असा मुंबई चा वडापाव ….
सर्वांच्या खिशाला आणि खिसे नाश्त्याला देखील पोट भरून खाऊ देणारा मुंबईचा वडापाव …
कधी कुणाच्या प्रेमासाठी , तर कधी कुणाच्या मैत्री साठी आपले पण जागून देणारा मुंबईचा वडापाव …
अश्या या गर्दीत नाव घेताच मिळणारा आणि जिभेवर रेंगाळणारा मुंबईचा वडापाव …
कुणी मुंबई मध्ये येउन जसे स्वतःला सोपौन देते तसेह वडा देखील तेलात उसंडी मारून सोपाऊन देतो…
तळून निघालेला बटाट्याचा वडापाव …
अनेकांची सकाळ हि वडापावनेच होते ,काहींची संध्याकाळ वडापाव ने संपते…
कधी कुणाच्या दुपारचा डब्बा तर कुणाच्या आयुष्याचा सोबती …
कोणाची भूक तर कोणाचे पोट… उदरनिर्वाहाचा हा वडापाव ….
धकाधाकीच्या जीवनात घश्या खाली दोन घास वडापावचे गिळून पुन्हा कामाला लागणाऱ्या मुंबईकरांसाठी …
असा हा मुंबईचा स्वस्त आणि मस्त लाल चटणीवर घोलणारा मुंबईचा " वडापाव … !!!
तुम्ही खाल्ला आहे का ? मला पण सांगा तुमच्या area मध्ये असलेला famous वडापाव ...!
#mumbaifood
#vadapav
#localfood