Sawantwadi Palace...
सावंतवाडी च्या लाकडी खेळण्यांप्रमाणेच सावंतवाडीचा राजवाडा हि तितकाच प्रसिद्ध आहे.
सावंतवाडी हि स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानाची राजधानी. येथे भोंसले घराण्याची सत्ता होती. १९४७ साली ते भारतीय प्रजासत्ताकात विलीन झाले. आधी सावंतवाडी संस्थान आजच्या उत्तर गोवा मधील पेडणे, डिचोली, सत्तारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ ते वेंगुर्ला पर्यंत पसरलेले होते. पेडणे, डिचोली, सत्तारी हे नंतर पोर्तुगीजानी आपल्या साम्राज्याला जोडले, आणि नंतर गोवा मध्ये विलीन झाले.
हा राजवाडा १७५५ ते १८०३ या काळात बांधण्यात आला. हा राजवाडा सध्या तीन भागात विभागला गेलेला आहे. सध्याच्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाण, राज दरबार आणि म्युसिअम.
राजवाडा बघण्यासाठी २० रुपये तिकीट आहे. सोबत एक गाईड तुम्हाला राजवाडा दाखवतो.