!! जय जिजाऊ जय शिवराय
मला वेड लागले - सह्याद्रीचे
सहयाद्रीचे वर्णन करावे तेवढे कमीच आहे कारण तिथला डोळ्याला भावनारा नयन रम्य निसर्ग ऊंच ऊंच कड़े कपारे डोंगर लांब लांबवर वाहणाऱ्या नदया मनाला शांत करणारे वातावरण आणि मुख्य म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षीदार असलेली अशी ही भन्नाट सह्याद्रि .....!!!
आपण आपल्या आयुष्या मध्ये जेव्हा कधीही सह्याद्री मध्ये पाऊल ठेवू तेव्हा आपण आपले सर्व भान विसरून फक्त आणि फक्त ह्या सह्याद्रीच रूप भरभरून बघत रहावे. सह्याद्रीच ते देखणं रूप सजलेलं सौंदर्य आपल्या डोळयात साठवून ठेवावं.जणू काही हि सह्याद्री आपल्या बरोबर बोलतेय असच वाटू लागत . दूरदूरून वाहत येणारी हवा खूप काही बोलून जाते आपण हरवून जातो त्या शांततेत ..ते उंच उंच डोंगर खोलवर नजर ही पोहचत नाही अश्या दऱ्या हे सगळं बघून भीती तर कुठच्या कुठे पळूनच जाते हे मात्र नक्की अनुभवयाला भेटत....!!!
असाच काही छान अनुभव मलाही आला आहे.......
मी केलेल पहिल ट्रेकिंग सह्याद्रीचा हरिश्चंद्र गड (महाराष्ट्राचा कोकणकडा).आणि त्या नंतरच मला वेड लागलं ते सह्याद्री पुन्हा पुन्हा बघण्याच ते अजूनही वाढतच जात आहे.
माझ्यासाठी ट्रेक हार्ड होता पण गड किल्ले बघण्याची उत्सुकता मनात होती आणि ती पूर्ण व्हावी म्हणून जाण्याच धाडस केलं होत. हरिश्चंद्र गडाचा पायथा म्हणजेच खिरेश्वर मार्गाने रात्रीच्या काळोखात हातात टॉर्च घेऊन बरोबर ३ वाजता चढाई चालू केली होती छान थंडगार हवेची झुळूक लागत होती आणि त्या घनदाट काळोखात एक सुंदर दृश्य बघायला भेटल ते म्हणजे आकाशात पडलेलं चांदणं तो नजराणा काही औरच. पुढे टोलार खिंड पार करून सूर्योदय होण्या आधी तारामती शिखरापर्यंत पोहचायचे होते. थकलेल्या अवस्थेत एखदाचे तिथे पोहचले नद्यांच्या आणि डोंगऱ्याच्या पलीकडून लाल गडद रंगाचा सूर्य हळू हळू वर येत होता हे सर्व बघताना सगळ भान हरपून गेलं होत कारण क्षणच तसा होता सह्याद्रीचा सूर्योदय बघण्याच भाग्य लाभलं होत ……..मन हि भरून गेल आणि थकवा हि गेला होता हा सर्व देखावा पाहत असताना आपण कुठे आहोत काय अनुभवतो हे सर्व काही विसरूनच गेले होते .....
त्या नंतर अर्ध्या तासाच अंतर खाली उतरून गडावरच सर्वात मोठ आकर्षण म्हणजे कोकण कडा सगळ्यात अद्वितीय नयनरम्य निसर्गाचा देखावा. डोंगर झिझुन पडलेली अर्धी कडा आणि लांब लांबवर दिसण्याऱ्या डोंगर दऱ्या खरोखरच खूपच अप्रतिम सौंदर्य समोर दिसत आहे हे खरंच वाटेना एक सुखद धक्काच .....!!
कोकण कड्याच्या काही अंतरावर पुरातन काळात बांधल गेलेल पाषाण दगडाच गणपती बाप्पाच मंदिर आणि एक मंदिर तिथे शंकरांची पिंडी आहे हे सर्व बघण्यासारख आहे तिथले स्वछ निर्मळ थंडगार पाणी पिऊन तहानच भागली गेली होती मंदिराच्या बाजूला पाण्याचे छोटे कुंड आहेत त्यात एक मोठ कुंड असून त्याच्या भोवताली छोट्या छोट्या चौकोनी खोल्या आहेत. गडावर बघण्यासारख्या अश्या बऱ्याच गुंफा आहेत. त्यापैकी एक केदारेश्वराची गुंफा आहे त्यात एक मोठे शिवलिंग पाण्यामध्ये आहे त्याच्या भोवतालच्या चार खांबांपैकी सध्या एकच खांब पूर्ण अवस्थेत आहे हे त्याच वैशिष्ट्य आजू बाजूला माणसाच्या कंबरे पर्यन्त लागेल इतके पाणी आहे.
किती छान आहे हे सगळं कस निर्माण झालं आणि कोणी केलं असाव . जुन्या काळात ह्या गडावर कोणता इतिहास घडून गेला असावा हा सगळा विचार करत करत गडावरच सुंदर सुखद सौंदर्य डोळ्यात भरून परत परतीच्या मार्गावर .
आर्या कांबळी .
सह्याद्री प्रेमी .