नमस्कार
सुट्टीच्या दिवसात जर कोकणात फिरायचा प्लॅनिंग करत असाल तर आणि रत्नागिरीला एखादी फेरी होणार असेल तर एकदा रत्नागिरीतील फिश जेटी ला नक्की भेट द्या..
आत्ता तुम्ही म्हणाल त्यात काय बघायचं घाण वास अस्वच्छ परिसर त्यात कसला टुरिस्ट पॉइंट.. पण मला अस वाटत आपल्याकडे कोकणात मश्यावर सुद्धा एक तर होऊ शकते जे कोणी फिश प्रेमी असतील त्यांना तर हे नक्कीच आवडेल..मागे निथल समुद्र त्यात भव्य मोठ्या अश्या फिशिंग बोट खूप मोठ्या प्रमाणत होणारी माशाची लीलावी हे आपल्याला जेटि वरच बघायला मिळेल आणि मुख्य म्हणजे असे काही माश्याचे प्रकार मिळतील जे आपण कधीच खाले नसतील
तर रत्नागिरी शहरामध्ये एट्री करताना पहिलाच लेफ्ट म्हणजे साळवी स्टॉप वरून लेफ्ट घेऊन जो सरळ अगदी रोड जातो तो मरिकरवाडा जेटी वर किंवा आपण मिऱ्या बंदर सुद्धा बोलू शकतो अगदी शहरापासून १०/१२ किलोमीटर अंतरावर ही जेती आहे..
जेटी वर जाण्याचं टायमिंग म्हणजे सकाळी ७ ते ८ यामधे कारण अस की आत्ता जे मी फोटोज् शेअर केलेत ते सकाळचे आहे त्यात बघून तुम्ही अनुभव घेऊ शकता की सकाळी किती छान वातावरण असेल ते म्हणत आकाश त्यात एवढा मोठा समुद्र डोळ्यासमोर हे वातावरण सगळ्यांनाच नाही आवडणार कारण आपण आपला दृष्टिकोन थोडा बदलला तरच आपण अजून जास्त चांगल्या रित्या त्याच्याकडे पाहू शकतो..