Humpi, vijaynagara काळातले मंदिर, साम्राज्य आणि खुप काही अवशेष असलेला हे छोटसं गाव आहे.
सर्वात कमालीची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ईथे भटकत असता आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सापडत जातात... हंपी म्हणजे भटकणार्या साठी अप्रतिम ठिकाण आहे... सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त (hampi मधे सूर्योदय आणि सूर्यास्त कधीच miss करू नका) ईथे फिरायला आल्यावर दिवसाची सुरूवात माटुंगा hill वरुण सूर्योदय पाहून आणि दिवसाचा शेवट निवांत पणे hemakuta टेकडी वर सुर्यास्त पहा...tungabhadra नदी मधून coracle ride घेणा हा पन एक अनुभवच आहे..
Tungabhadra नदी मधून coracle ride करून तुम्ही 1000 शिवलिंग पाहू शकता...ह्या सगळ्या गोष्टी आत्ता ईतक्या सुंदर दिसतात तर त्याकाळात हे शहर कित्ती सुंदर असेल असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही...
विरुपाक्ष मंदिर आणि विठ्ठल मंदिर हम्पी मधले महत्त्वाच्या मानले जाणार्या इमारती आहेत़. विठ्ठल मंदिरांमध्ये अगदी सुरुवातीलाच असणारा दगडाचा रथ हा आपल्या नोटे वर पन पाहायला मिळतो.. त्यामुळे तिथे जाऊन फोटो काढण्याची क्रेझ लोकांमधे दिसत होती...
आम्ही ऐन उन्हाळ्यामध्ये गेल्या मुळे फारशी गर्दी नव्हती पण उन्हामुळे भटकायला लिमिटेशन्स येत होते.. त्यामुळे तुम्ही तुमची हम्पीची backpacking ट्रिप प्लॅन करत असाल तर हिवाळ्या मधे गेलात तर हम्पी अजून छान दिसेल..