मी एक उत्सवी आणि उत्साही माणूस आहे. मी प्रत्येक क्षण आनंदाने, उत्साहाने जगून उत्सव साजरा करतो. त्यापैकी काही निवडक क्षण कायम स्मरणात राहतात. असाच क्षण काही दिवसांपूर्वी वाट्याला आला. मागच्या विकेंडला जुन्या सहकार्यांच्या एका ग्रुपसोबत महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला अर्थात कळसुबाईला सर केले. लय म्हणजे लयच मजा.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी हिरवागार शालू परिधान केलेला. लहान लेकरू जसं अंगणात मनमुरादपणे खेळतं तसं सह्याद्रीच्या कुशीतून वाहत येणारं पाणी मनमुरादपणे डोंगराडोंगरात धिंगाणा घालत होतं. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर राहणारी झाडं थंडगार हवेचा वर्षाव करत होते. मधूनच काळेकुट्ट दिसणारे ढग आमच्यावर पाणी उडवून आम्हाला भिजवत होते. तर ढगांचं छत आणि सह्याद्रीच्या भिंती आणि वाऱ्याचा थंडावा आम्हाला मुक्त आणि विशाल असा एसी दालनात बसल्याची अनुभूती देत होत्या.
कळसुबाई सर करायला तब्बल ४ तास लागले. पण त्या चार तासातील प्रत्येक क्षण आमच्या ग्रुपने उपभोगला. समुद्रसपाटीपासून बरोबर 5400 Feets अंतरावर आकाशाच्या दिशेने कळसूबाईवर पोहोचण्याचा आनंद इथे सांगू शकत नाही.
कळसूबाई पर्वतावर पोहोचल्यावर खालच्या दरीकडं बघितलं तरी धडकी भरत होती. पाय जमिनीवर घट्ट रोवले तरीही वारा दगा देत होता. त्यामुळे दरीत पडण्याची भीती वाटायची. चुकून हुकून दरीत पडलोच तर वाचवायला कोणच येऊ शकलं नसतं. मात्र, पाय जमिनीवर पक्के असले की तुम्ही कितीही उंच पोहचलात तरीही तुम्हाला कोणी धक्का पोहचू शकत नाही आणि उंचावरून तुम्ही खाली पडलात तर तुम्हाला वाचवायला कोणच येत नाही, ही फिलॉसॉफी शिकलो राव आपुन कळसुबाईवर!
https://www.facebook.com/hoeeeeo/videos/1975677845809546/?t=0
#maharashtratreks
Pic and content courtesy by Ashish Chikane.
Please inbox us for more details.