रात्री अचानक विजेचा कडकडाट सुरू झाला वेळ होती ती मध्यारात्रीची...! असं वाटलं की दरवर्षी पाऊस येतो तसाच हा जणू पाऊस पडेल असा आभास झाला आणि जोरजोराने वारा वाहू लागला. विजेचा कडकडाट ऐकू आला. अचानक मला जाग आली भयंकर वारा सुटला होता आणि त्या जोडीला पाऊस, झाडांचा आवाज, ढगांचा गडगडाट, प्रचंड काळोख,विजेचा लखलखाट .विज जणू काही खाली जमिनीवर पडू लागली की काय. अचानक घरातील विजेचा प्रवाह बंद झाला.घरातील सर्व मंडळींची झोप उडाली सुमारे तीन तास झाले पाऊस काही कमी होत नव्हता त्याला साथ वादळं वारा यांची. मनात भीतीचं वातावरण निर्माण झाले. काय होईल अन् काय नायं. सकाळी सहा वाजल्यापासून अगदी पाऊस कमी झाला पण वादळ वारा जसा भयंकर वाहत होता तसाच वेगाने वाढत होता आणि काही प्रमाणात पाऊस हा रिमझिम सुरू होता. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल सुरू झाली होती घरची मंडळी उठून आपल्या कामाला लागली होती समुद्र किनारपट्टी जवळपास सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता अगदी दुपार होऊन गेली तरी काही वारा कमी होईल असे काही दिसत नव्हते आणि ते वादळ म्हणजे ''तौक्ते"